बिर्याणीच्या पैशांवरुन झालेल्या वादानंतर टोळक्याने टिक्का भाजण्याच्या सळईने बिर्याणी विक्रेत्यावर चढवला हल्ला
Views: 442
0 0

Share with:


Read Time:2 Minute, 10 Second

पुणे, 16 जानेवारी : पुण्यात पुन्हा एक जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. बिर्याणीच्या पैशांवरुन झालेल्या वादानंतर तुफान हाणामारी झाली. ही घटना हडपसर येथे घडली असून बिर्याणी शॉपच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही आता समोर आला आहे. या सीसीटीव्हीत दिसत आहे की, बिर्याणीच्या पैशांवरुन झालेल्या वादानंतर टोळक्याने टिक्का भाजण्याच्या सळईने बिर्याणी विक्रेत्यावर हल्ला चढवला.

मिळालेल्या माहितीनुसार, बिर्याणीचे पैसे मागितल्याच्या रागातून ही मारहाण करण्यात आली आहे. मारहाण करून नुकसान करणाऱ्या तिघांवर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काळेबोराटेनगर येथे 12 जानेवारी 2022 रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी मुईनुद्दीन खान यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, काळेबोराटेनगरमधील यशराज ग्रीन कास्टल येथे फिर्यादी केटरिंगचे काम करत होते. त्यावेळी आरोपीने साथीदाराच्या मदतीने बिर्याणीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून धमकी देत शिवीगाळ करीत, टिक्का भाजण्याच्या सळईने मारहाण केली. दुकानातील टाईल्स फोडून नुकसान केले, सळई हवेत फिरवून आजूबाजूच्या दुकानदारांना दुकाने बंद करण्यास भाग पाडून परिसरात दहशत निर्माण केली. हडपसर पोलीस स्टेशनचे सहायक पोली

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
1
Is there any news?