सार्वजनिक जीवनात वावरताना अनेक जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या महिला कौतुकास्पद – महापौर माई ढोरे
Views: 553
0 0

Share with:


Read Time:4 Minute, 39 Second

पिंपरी चिंचवड, दि, ९ मार्च २०२२ :-  सार्वजनिक जीवनात वावरत असताना महिलांवर  घर, संसार आणि कार्यालयीन कामकाज अशा जबाबदाऱ्या असून, महिला त्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत आहेत त्यांचे खरोखरच कौतुक करते , असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे महानगरपालिकेतील महिला अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या प्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, आयुक्त राजेश पाटील यांच्या पत्नी स्मिता पाटील, सह आयुक्त आशादेवी दुरगुडे, सहाय्यक आयुक्त  वामन नेमाणे, कार्यकारी अभियंता प्रेरणा शिनकर, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. उज्वला आंदुरकर, जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया आंबेडकर, प्रशासन अधिकारी रोहिणी शिंदे, संगणक अधिकारी अनिता कोटलवार, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप,जनसंपर्क विभागाचे  माहिती अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे, पत्रकार सायली कुलकर्णी, शुभांगी चव्हाण, सुनिता पळसकर, अभिमान भोसले, सीमा जोशी, माया वाकडे तसेच महापालिकेतील महिला अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

महापौर माई ढोरे म्हणाल्या, महिलांनी शहरातील स्वच्छता मोहिमेमध्ये महत्वाची भूमिका बजावली असून  घरातील कच-याचे विलगीकरण करून स्वच्छाग्रह मोहिमेत आपला सहभाग नोंदवला आहे, ही बाब अभिमानास्पद आहे.

आयुक्त राजेश पाटील यांच्या पत्नी स्मिता राजेश पाटील यांनी उपस्थित महिला कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. महिलांनी आपल्या जबाबदा-या पार पाडत असताना स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सकस आहार घेतला पाहिजे, तसेच नवनवीन छंद जोपासले पाहिजेत, साहित्याचे वाचन केले पाहिजे आणि दररोज नवीन काहीतरी शिकण्याची जिज्ञासा ठेवली पाहिजे. असे सांगून त्यांनी महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा तसेच मान्यवरांचा  सत्कार महापौर माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये  सह आयुक्त आशादेवी दुर्गुडे, पहिल्या महिला कार्यकारी अभियंता  प्रेरणा शिनकर, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. उज्वला आंदुरकर, जेष्ठ वैधकीय अधिकारी डॉ. विजया आंबेडकर, प्रशासन अधिकारी रोहिणी शिंदे, संगणक अधिकारी अनिता कोटलवार, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांचा समावेश आहे. तसेच शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे यांचा सत्कार सहाय्यक आयुक्त वामन नेमाने यांच्या हस्ते करण्यात आला.

यानंतर “स्वरसागर म्युझिक इवेंट” या संस्थेने महिलांसाठी गीत गायनाचा आणि मनोरंजनाचा  कार्यक्रम  सादर केला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक आणि सुरेखा कुलकर्णी यांनी केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

One thought on “सार्वजनिक जीवनात वावरताना अनेक जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या महिला कौतुकास्पद – महापौर माई ढोरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?