आदि महोत्सव – २०२२” तून नागरिकांनी अनुभवली आदिवासी संस्कृती
Views: 751
3 0

Share with:


Read Time:7 Minute, 31 Second

पुणे – आदिवासी हस्त व नृत्यकलेला प्रोत्साहन व उत्तेजन देण्यासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे द्वारा “आदि महोत्सव – २०२२” या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या प्रांगणात दि. ( बुधवार ) २३ मार्च ते २७ मार्च २०२२ या कालावधीत करण्यात आले होते. महोत्सवातंर्गत आदिवासी हस्तकला प्रदर्शन, आदिवासी पारंपारिक नृत्यस्पर्धा व आदिवासी जीवनावर आधारित लघुपट विनामुल्य दाखविण्यात आले. टीआरटीआय संस्थेच्या वतीने आयोजित महोत्सवा अर्तगत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आली होती. नागरिक, कला समिक्षक, संग्राहक, कलाकुसरीचे प्रेमी यांना शासनाच्या माध्यमातून जणू ही एक ५ दिवसीय मेजवाणीच होती.
या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातून एकूण १०० आदिवासी हस्तकलाकारांना व ५०० नृत्यकलाकार आमंत्रित करण्यात आलेले होते. या प्रदर्शनात वारली चित्रकला, बांबूच्या व वेताच्या वस्तु, धातूच्या कलाकुसरीच्या वस्तु, आदिवासी दाग-दागिने, कांगदी लगद्याचे व लाकडाचे मुखवटे, इत्यादी हस्तकला वस्तूंचा प्रदर्शनात समावेश होता. आदी-महोत्सव २०२२ आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, २८, क्विन्स गार्डन, व्हिव्हिआयपी. विश्रामगृह जवळ व जुने सर्किट हाऊस जवळ, पुणे ४११००१ येथे संपन्न झाला.
“आदि महोत्सव – २०२२” या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाजकल्याण विभाग, पुणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे, श्री. राहुल मोरे, आयुक्त महिला व बालविकास, पुणे, श्रीमती. अश्विनी भारुड, उपायुक्त परिक्षा परिषद, पुणे, श्री. महेंद्र वानखेडे सर, अधीक्षक अभियंता, पुणे, श्री. डॉ. राजेंद्र भारुड, आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे, श्री. साखर आयुक्त शेखर गायकवाड, श्रीमती. जागृती मॅडम, सहसंचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे, श्री. गजेंद्र केंद्रे सर, उपसंचालक (प्र), अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, पुणे, श्री. सचिन जाधव, वरिष्ठ संशोधन अधिकारी, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, पुणे, श्री. हंसध्वज सोनवणे, उपसंचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे श्री. विनीत पवार, लेखाधिकारी, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे श्री. श्यामकांत दौंडकर, संशोधन अधिकारी, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे श्री. विजय डगळे, सांस्कृतिक अधिकारी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे आदी व इतर मान्यवर उपस्थित होते.
आदिवासी जीवनावर आधारित लघुपट
या महोत्सवात आदिवासी जीवनावर आधारित लघुपट विनामूल्य दाखविण्यात आले. लघुपट महोत्सवास नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. ४ ते ५ आदिवासी जीवनावर आधारित लघुपट प्रेक्षकांना दाखविण्यात आले.
आदिवासी हस्तकला प्रदर्शन व विक्री
आदिवासी हस्तकला वस्तुंना नागरी भागात मोठया प्रमाणावर बाजारपेठ उपलब्ध असल्यामुळे दुर्गम भागात राहणारे आदिवासी व नागरी भागातील ग्राहक यांना एकत्रित आणून आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या वस्तू प्रदर्शित करुन त्यांच्या विक्रीव्दारे या कलाकारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात आली होती.
प्रदर्शनात विक्रीसाठी असलेल्या कलाकृती
हस्तकाला, आदिवासी पुस्तके, बांबू आर्ट, वॉल पेंटिंग, वारली पेंटिंग,पेन स्टॅन्ड, टिशू स्टॅन्ड, कार्ड होल्डर, किचन, फुलदाणी, फुले, कपडे, साड्या, शोच्या वस्तूंचा समावेश होता. खाद्यप्रेमींसाठी :- चुलीवरचे चिकन, खेकडे, कोळंबी, सुकट, भाकरी (ज्वारी, बाजरी, तांदूळ ) मासेवडी, भात, थालपीठ, आप्पे, घावन, दही, ताक, मठ्ठा, कोकम इ. पदार्थांचा समावेश होता.
-आदिवासी कलाकारांनी जिंकली प्रेक्षकांची मने
आदिवासी कलाकारांनी जिंकली प्रेक्षकांची मने, आदिवासी बांधवांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आदिवासी पारंपारिक नृत्य स्पर्धेचे आयोजन संस्थेच्या प्रागंणात करण्यात आले होते. यावेळी पहिल्या तीन नृत्य पथकांना पारितोक्षिक देउन सन्मानीत करण्यात आले तर एका नृत्य पथकाला उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले. पहिल्या क्रमांकाच्या पथकास २५ हजार ०१, द्वीतीय १५हजार ०१, तृतीय १० हजार ०१ तर उत्तेजनार्थ ५ हजार ०१ रूपायांचे बक्षिस देण्यात आले. या स्पर्धेचा औपचारिक बक्षिस वितरण समारंक्ष २६ मार्च २०२२ रोजी, संयकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून योगिता म्हस्के आणि शिल्पा दीक्षित यांनी काम पाहिले. तर नम्रता कामत यांनी सुत्रसंचलन केले.
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे द्वारा “आदि महोत्सव – २०२२” हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेतील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्तन केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
100 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
1
Is there any news?