पुणे,दि. ३० : हिरे आणि सॉलिटेअर ज्वेलरी’च्या चाहत्यांसाठी रांका ज्वेलर्सतर्फे आपल्या चिंचवड येथील एम्पायर इस्टेट मधील भव्य दालनात ‘डिव्हाईन सॉलिटेअर लाउंज’ ही स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशाप्रकारची ही भारताती पहिली हिरे आणि सॉलिटेअर यांना समर्पित सुविधा असून, याचे उदघाटन अभिनेत्री राधिका आपटे हिच्या हस्ते झाले.
या उदघाटन कार्यक्रमप्रसंगी रांका ज्वेलर्स’चे संचालक तेजपाल रांका, डिव्हाईन सॉलिटेअर संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक जिग्नेश मेहता उपस्थित होते. यावेळी राधिका यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
रांका ज्वेलर्स’सोबतच्या जुन्या आठवणीना उजाळा देत राधिका आपटे म्हणाल्या, “ रांका ज्वेलर्स’चे आणि माझे खूप जुने नाते आहे. त्यांच्या लक्ष्मी रस्ता येथील शाखेत पहिल्यांदा माझे नाक आणि कान टोचण्यात आले होते. आज त्यांच्या या नवीन सुविधेचे उदघाटन करताना मला अतिशय आनंद होत आहे. याठिकाणी मला हिरे या प्रकाराबाबत बरीच माहिती मिळाली आणि त्यातून माझ्या ज्ञानात अधिक भर पडली.’’
दागिने खरेदीबाबत त्या म्हणाल्या, “ लहानपणापासून मी नेहमीच दागिने हरवत असते. त्यामुळे आतापर्यंत मी स्वतःहून कधीच दागिने खरेदी केली नाही. तर माझ्या आजी आणि आईचे जे दागिने आहेत, तेच मी वापरते. मात्र यापुढे नक्की दागिने खरेदी करेल. त्यातही हिरे आणि व्हाईट गोल्ड यांच्या खरेदीला अधिक प्राधान्य असणार आहे.
एक ग्राहक म्हणून दागिने खरेदी करताना मी नेहमी चांगला दर्जा, किमतीतील पारदर्शकता आणि नितीमत्ता या तीन गोष्टी आवर्जून पाहते. रांका ज्वेलर्स’च्या दालनात तुम्हाला या तीनही गोष्टी आढळतात. यामुळेच सोने-चांदी अथवा हिऱ्यांचे दागिने खरेदीचा एक परिपूर्ण अनुभव तुम्हाला याठिकाणी घेता येतो. त्यांचे हे नवीन दालन नक्कीच ग्राहकांसाठी एक संपन्न करणारा अनुभव असेल, असेही राधिका यांनी यावेळी सांगितले.
तेजपाल रांका म्हणाले, “ हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खरेदीला पसंती देणारे चाहते हे नेहमीच काहीतरी नवीन, आकर्षक पर्यायाच्या शोधात असतात. खास हिऱ्याच्या चाहत्यांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देणे, या कल्पनेतून आम्ही हिरे आणि सॉलिटेअर ज्वेलरीसाठी समर्पित असलेली ‘डिव्हाईन सॉलिटेअर लाउंज’ ही स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून दिली आहे.’’
हिऱ्यांच्या दागिन्यांचे पुनर्विक्री मूल्य आणि सुरक्षितता याबाबत बोलताना डिव्हाईन सॉलिटेअर’चे जिग्नेश मेहता म्हणाले, “ लोक हिरे खरेदी करण्याची आकांक्षा बाळगतात परंतु त्याच्या खरेदी करण्यासाठी नेहमी घाबरतात, विशेषत: जेव्हा किंमत आणि पुनर्विक्री मूल्याबाबत ते नेहमीच काहीसे साशंक असतात.
मात्र हिऱ्यांचे पुनर्विक्रीचे मूल्य सोन्याइतकेच चांगले आहे आणि दर महिन्याला आम्ही हिऱ्यांचे बाजारातील मूल्यांचे नवीन दराबाबत माहिती देत असतो. त्याची अचूकता, सत्यता आमच्या वेबसाइटद्वारे तपासली जाऊ शकते. हिऱ्यांचे दर दुप्पट झाल्याची आणि विक्री करताना लोकांना चांगला परतावा मिळाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्याचबरोबर आम्ही प्रत्येक हिऱ्यामध्ये एक खास क्रमांक कोरला आहे, ज्यामुळे चोरी होणे, हरवणे अशा घटनेत त्या हिऱ्याचा शोध घेणे शक्य होते. तसेच संबंधित हिरा दुसऱ्या दागिन्यात वापरला तरी, या कोरीव क्रमांकामुळे हिऱ्याचा शोध घेतला जाऊ शकतो.’’
‘डिव्हाईन सॉलिटेअर लाउंज’ हे शहरातील हिरे प्रेमींसाठी हा एक नवीन अनुभव असेल. हिरे खरेदीदारांच्या इच्छा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेली ही एक स्वतंत्र सुविधा आहे. याठिकाणी डिव्हाईन सॉलिटेअर्स ज्वेलरींची संपूर्ण श्रेणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आली आहे. समकालीन संकल्पनेवर आधारित विविध कलेक्शनची गॅलरी, सणासुदीच्या हंगामात ट्रेंड होणारी डायमंड कॉइन्स हे याचे वैशिष्ट्य असणार आहे. इतकेच नव्हे, तर जगातील प्रसिद्ध हिन्यांच्या अचूक प्रतिकृती नागरिकांना याठिकाणी पाहता येणार आहे, ज्यामध्ये लोकप्रिय अशा कोहिनूर हिऱ्याचादेखील समावेश आहे.
हिऱ्यांचे स्वतःहे एक विशेष स्थान असते. एनगेजमेंट, लग्नाचा वाढदिवस यासारखे महत्वाचे प्रसंग साजरे करण्यासाठी, आपल्या प्रियजनांसोबत प्रेम आणि विश्वासाचे बंधन अधिक घट्ट करण्यासाठी हिऱ्याच्या दागिन्यांना खास पसंती दिली जाते. इतिहासातही हिऱ्याला विशेष महत्व आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन,आम्ही ही खास सुविधा नागरिकांसाठी घेउन आलो आहोत. याठिकाणी खरेदीदार अतिशय आरामदायी वातावरणात त्यांच्या प्रियजनांसाठी सर्वोत्तम हिरे खरेदीचा आनंद घेऊ शकतील, असेही मेहता यांनी सांगितले.