नागपूर, 2 जानेवारी : नववर्षाच्या सुरुवातीला नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील ईसापूर शिवारात भीषण अपघात झाला आहे. भरधाव बुलेरो पिकअप झाडावर आदळल्याने चार मजुरांचा मृत्यू झाल्याची तर 7 मजूर गंभीर जखमी झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ही दुर्घटना मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की, तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात एकच शोककळा पसरली आहे. घटनेत मृत मनीषा कमलेश जी सलाम (38 वर्षे), मंजुषा प्रेमदास उईके (40 वर्षे), कलाताई गंगांधर परतेती (50 वर्षे), यांचा जागीच मृत्यू झाला तर मंजुळा वसंता धुर्वे (50 वर्षे) यांचा नागपूर येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मोहपा येथे संत्रा गाडी भरून काटोल तालुक्यातील अंबाडा गावातील हे मजुर 10 मजूर आणि ड्रायव्हर अशी 11 जण मोहपा सावनेर मार्गे वरून अंबाडा काटोल परत येत असतांना मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला आहे.