लक्झरी बस आणि टँकर यांच्या भीषण अपघातानंतर खाजगी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतला; आगीत आठ प्रवासी जळून खाक
Views: 188
0 0

Share with:


Read Time:1 Minute, 40 Second

नाशिक 08 ऑक्टोबर : औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर लक्झरी बस आणि टँकर यांच्यात शनिवारी पहाटे 5 वाजून 15 मिनिटाच्या सुमारास भीषण अपघातात झाला. या अपघातानंतर चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतला. या आगीत बसमधील जवळपास सात ते आठ प्रवासी जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यवतमाळ येथून बस मुंबईकडे जात असताना सदर अपघात घडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
घटनास्थळी अग्निशमन दलाची तीन ते चार वाहनं तसेच चार ते पाच रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. साधारणपणे अर्धा तासाहून अधिक काळ पेटलेली बस विझवण्याचा प्रयत्न सुरू होता. बस पेटल्यानंतर ज्या प्रवाशांना बसमधून खाली उतरता आलं त्यांनी उड्या मारल्या तर आतमध्ये अडकलेले प्रवासी आगीमुळे जळून खाक झाले. या घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे

सदर अपघातानंतर बस 50 ते 60 फूट पुढे घसरत गेली तर टँकर 70 ते 80 मीटर पुढे जाऊन थांबला. या अपघातात बसने पेट घेतल्याने जळून मयत झालेल्या नागरिकांचे मृतदेह महापालिकेच्या सिटी लिंक बसमधून हलविण्यात आले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Open chat
1
Is there any news?