मुंबई विमानतळावर कस्टम विभागाची खूप मोठी कारवाई; विदेशी नागरिकाकडून 35 कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडले
Views: 488
0 0

Share with:


Read Time:5 Minute, 18 Second

मुंबई, 2 ऑक्टोबर : अंमली पदार्थांना भारतात बंदी आहे. पण तरीही भारतात चुप्या पद्धतीने काही लोक अंमली पदार्थांचा अवैध व्यापार करत असल्याचं अनेकवळा समोर आलं आहे. अंमली पदार्थांची किंमत ही अव्वाच्या सव्वा असते. त्यामुळे सर्वसामान्य माणूस अंमली पदार्थांची खरेदी करणं शक्यच नाही. अर्थात त्याला एखादी व्यक्ती अपवाद असू शकते. पण भारतात अंमली पदार्थांचा अवैध पद्धतीने व्यापार चालतो हे वेळोवेळी समोर आले आहे. कारण अनेकदा कस्टम विभाग आणि इतर विभागांनी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. पण तरीही ड्रग्ज तस्तक आणि या अंमली पदार्थांची तस्करी काही कमी होताना दिसत नाहीय. नवी मुंबईच्या वाशी शहरात काल एका ट्रकमध्ये तब्बल 1476 कोटींचे ड्रग्ज जप्त केले असताना आज पुन्हा ड्रग्जशी संबंधित बातमी समोर आली आहे. यावेळी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईतेखील तब्बल 35 कोटी रुपयांचं ड्रग्ज आढळलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबई ही ड्रग्ज तस्कारांचा अड्डा तर होत नाहीय ना? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.
मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने खूप मोठी कारवाई केली आहे. कस्टम विभागाने तब्ल 35 कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडले आहेत. एका विदेशी नागरिकाने हे ड्रग्ज विमानतळावर आणले होते. त्याच्या सूटकेसमध्ये हे ड्रग्ज सापडले आहेत. तो ट्रॉली बॅगमध्ये लपवून ड्रग्ज भारतात आणत होता. पण कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची चोरी पकडली. आरोपी विदेशी नागरिकाच्या बॅगेत पाच किलो हाय क्लालिटीचे हेरॉईन सापडले आहे. या हेरॉईनची किंमत 35 कोटी रुपये इतकी आहे.
कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी 35 कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहेत. तसेच आरोपी विदेशी नागरिकाला देखील बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी हे ड्रग्ज नेमके कुठून घेऊन आला? तो कुणाला ते ड्रग्ज देणार होता? तो नेहमी अशाप्रकार ड्रग्ज घेऊन आणायचा का? ड्रग्जचा काळाबाजार करणारी त्यांची गँग आहे का? तो भारतात नेमकं कुणासाठी ड्रग्ज घेऊन आला होता? तो ते ड्रग्ज नेमके कोणाला विकणार होता? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रश्नावर आरोपी नेमकं काय जबाब देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

दरम्यान, मुंबईच्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी कालदेखील खूप मोठी कारवाई केली आहे. डीआरआयच्या (Directorate of Revenue Intelligence) अधिकाऱ्यांनी काल नवी मुंबईच्या वाशी येथून एक ट्रक पकडला होता. हा ट्रक आयात होणाऱ्या संत्र्यांची वाहतूक करायचा. या ट्रकला पकडल्यानंतर खूप मोठ्या काळाबाजाराचा भंडाफोड झाला होता. या संत्र्यांच्या ट्रकमध्ये खूप मोठा काळाबाजार सुरु होता. कारण डीआरआयच्या अधिकाऱ्यांना या ट्रकमध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल 1476 कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले आहेत. हे ड्रग्ज पाहून अधिकारी देखील हैराण झाले होते. ड्रग्जवर बंदी असताना आरोपी इतक्या चाणाक्ष पद्धतीने काळाबाजार कसा करु शकतात? या विचाराने अधिकारी देखील चक्रावले आहेत.
डीआरआयने संबंधित ट्रक पकडल्यानंतर त्या ट्रकमध्ये नेमंक काय आहे याची झडती घेण्यास सुरुवात केली. ट्रकचालक आणि त्याच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीने ट्रकमध्ये संत्री असल्याची माहिती दिली. पण अधिकाऱ्यांना संशय आलेला होता. त्यामुळे त्यांनी ट्रकची झडती घेतली. यावेळी ट्रकमध्ये 198 हाय प्युरीटी क्रिस्टल मेथॅम्फेटामाइन (बर्फ) आणि 1476 कोटी रुपयांचे 9 किलो हाय प्युरीटी कोकेन आढळले. ते पाहून अधिकारी देखील हैराण झाले होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


रिपोर्टर टुडे न्यूज

Open chat
1
Is there any news?