पुणे: मोची, मादिगा, मादगी, मादरू महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने धारावी काळा किल्ला तेलगू मोची समाजाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष मारुती अण्णा पंद्री यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री वर्षा गायकवाड यांना प्रत्यक्ष भेट घेऊन मादिगा, मोची, मादगी, मादरूच्या जातीच्या दाखला मिळवण्यासाठी गेल्या वर्षापासून प्रलंबित असलेल्या दाखल्याबाबतचा प्रश्न व निर्णयाबद्दल सखोल चर्चा विनिमय करण्यात आले. त्याअनुषंगाने शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी तातडीने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व बार्टी कार्यालयास त्वरित पत्र देऊन समाजाच्या जातीच्या दाखल्याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले त्याबद्दल मोची मादिगा मादगी मादरू महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे मारुती अण्णा पंद्री व सर्व पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य व समाजातर्फे आभार व्यक्त केले.
लवकरच मुंबई येथील मंत्रालय येथे सामाजिक न्याय विभाग अधिकारी, तसेच बार्टी कार्यालय पुणे येथील सर्व अधिकारी वर्गासमवेत महासंघाच्या प्रमुख पदाधिकारी व शिष्टमंडळाची बैठक मुंबई येथे होणार असून त्या बैठकीत योग्य तो निर्णय घेण्याचे आशा निर्माण झाले आहेत.