पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे आयोजित ‘प्लॉगेथॉन’ मोहिमेत ७३ हजार नागरिकांनी घेतला सहभाग
Views: 251
0 0

Share with:


Read Time:9 Minute, 6 Second

पिंपरी चिंचवड २१ नोव्हेंबर :- विकासाबरोबरच आपले शहर देशातील स्वच्छ आणि सुंदर असावे यासाठी महापालिकेने स्वछाग्रह या मोहिमेची सुरुवात केली. या मोहिमेअंतर्गत महानगरपालिकेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. आज सकाळी ७ ते १० या वेळेत प्लॉगेथॉन मोहिम महानगरपालिकेतर्फे आयोजित केली होती. शहरातील ३२ प्रभागातील ६४ ठिकाणी ही मोहिम राबविण्यात आली.  या मोहिमेमध्ये सुमारे ७३ हजार ७३० नागरिकांनी सहभागी होत ६४ हजार ३९७ किलो प्लॅस्टीकसह इतर कचरा संकलित केला. या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्द्ल महापौर ढोरे यांनी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

या उपक्रमामध्ये शहरातील नामवंत खेळाडू, सिने अभिनेते, कलावंत, साहित्यिक, स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, मंडई असोसिएशन, व्हेंडर असोसिएशन, रिक्षा संघ, गणेश मंडळे, एजी-बीव्हीजी संस्था, ठेकेदार, एजन्सी, गृहनिर्माण संस्था,बचत गट, विद्यार्थी, हॉटेल असोसिएशन, पर्यावरणप्रेमी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी, सर्व अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.

सांगवी येथील पोलीस चौकी पासून महापौर ढोरे यांच्या उपस्थितीत मोहिमेला सुरुवात करण्यात आली.  माझी वसुंधरा शपथ घेऊन शहर स्वच्छतेचा संकल्प यावेळी करण्यात आला. तदनंतर पिंपरी चिंचवड शहर स्वच्छतेचा मंत्र या विषयावर आधारित नाटिका लहान विद्यार्थ्यांनी सादर केली. महात्मा गांधी, संत गाडगे महाराज यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले होते.

सांगवी पोलीस चौकी ते साई चौक दरम्यानचा रस्ता तसेच पीडब्ल्यूडी मैदानावरील कचरा यावेळी संकलित करण्यात आला. यावेळी शिक्षण समिती सभापती माधवी राजापुरे, प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्य हर्षल ढोरे, नगरसदस्या शारदा सोनवणे, सीमा चौगुले, सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, क्षेत्रीय अधिकारी विजय थोरात,  सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख, प्रशांत जोशी, बाळासाहेब खांडेकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओम प्रकाश बहिवाल तसेच महापालिकेचे अधिकारी कर्मचारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि बाबूराव घोलप महाविद्यालयाचे विद्यार्थी मोहिमेत सहभागी झाले होते.

या मोहिमेमध्ये संकलित केलेल्या कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी प्लॅस्टीक कच-यापासून विविध शोभेच्या वस्तू बनविण्यात येणार आहे. त्याचे प्रात्यक्षिक मोहिमेच्या प्रत्येक ठिकाणी ठेवण्यात आले होते. तसेच कचरा विलगीकरण करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात येत होते.

थेरगांव आणि पिंपळे सौदागर येथे आयुक्त राजेश पाटील, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, नगरसदस्य विठ्ठल उर्फ नाना काटे, शत्रुघ्न उर्फ बापू काटे, नगरसदस्या निर्मला कुटे, आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत, सिने अभिनेत्री भाग्यश्री मोटे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उपआयुक्त संदीप खोत, सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, मुख्य लिपिक सुरेखा साठे यांच्यासह नागरिकांनी प्लॉगेथॉन मोहिमेमध्ये सहभाग नोंदविला. यावेळी दत्त मंदिर ते स्वराज चौक दरम्यानचा परिसरातील कचरा संकलीत करण्यात आला.

चिंतामणी चौक, वाल्हेकरवाडी येथे सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, आरोग्य अधिकारी एम.एम. शिंदे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते.

भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृह येथे पक्षनेते ढाके यांच्यासह अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सहाय्यक आयुक्त राजेश आगळे, श्रीनिवास दांगट यांच्यासह राजमाता जिजाऊ महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी प्लॉगेथॉन मोहिमेमध्ये सहभाग  घेतला. तर संतोषी माता चौक ते वाघेरे पेट्रोल पंप दरम्यान उपआयुक्त आशादेवी दुरगुडे आणि मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे यांच्यासह नागरिकांनी मोठ्या संखेने सहभागी होत कचरा संकलन केले.

दिघी येथे उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले , नगरसदस्या निर्मला गायकवाड, मुख्य वित्त व लेखा अधिकारी जितेंद्र कोळंबे यांच्यासह शालेय विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, महानगरपालिकेचे कर्मचारी मोहिमेमध्ये सहभागी झाले होते.

आकुर्डी येथे निसर्ग दर्शन हाऊसिंग सोसायटी ते संजय काळे ग्रेड सेपरेटर दरम्यान नगरसदस्य अमित गावडे, नगरसदस्या शर्मिला बाबर, शैलजा मोरे यांच्यासह नागरिकांनी प्लॉगेथॉन मोहिमेमध्ये सहभाग नोंदवून हि मोहीम राबवली.

चिंचवड येथील मोरया रुग्णालय येथे ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्य अॅड. मोरेश्वर शेडगे, नगरसदस्या अश्विनी चिंचवडे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, प्रमोद ओंभासे, प्रशांत पाटील यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने मोहिमेमध्ये सहभागी झाले होते.

चिखली आणि मोशी येथे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, नगरसदस्य राहुल जाधाव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते.

शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, क प्रभाग अध्यक्ष राजेंद्र लांडगे, इ प्रभाग अध्यक्ष विकास डोळस, नगरसदस्य तुषार कामठे, संजय वाबळे, नितीन काळजे, मोरेश्वर भोंडवे, नगरसदस्या सीमा सावळे, वैशाली काळभोर, सोनाली गव्हाणे, निर्मला गायकवाड, शहर अभियंता राजन पाटील, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, सहशहर अभियंता मकरंद निकम, उपआयुक्त अजय चारठाणकर, सुभाष इंगळे आदींनी देखील या मोहिमेमध्ये सहभागी घेतला.

प्लॉगेथॉन मोहिमेमध्ये सहभाग नोंदवून मोहिम यशस्वी केल्याबद्दल पक्षनेते नामदेव ढाके आणि आयुक्त राजेश पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.  शहर स्वच्छतेच्या विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन आपले योगदान देत राहावे असे आवाहनही त्यांनी केले.

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
1
Is there any news?