ठाणे ते दिवा या मार्गावर कट आणि कनेक्शनच्या कामासाठी 36 तासांचा ब्लॉक
Views: 1484
0 0

Share with:


Read Time:3 Minute, 30 Second

मुंबई : ठाणे आणि दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं काम मध्य रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्यावतीनं करण्यात येत आहे. या निमित्तानं ठाणे ते दिवा या मार्गावर कट आणि कनेक्शनच्या कामासाठी 36 तासांचा ब्लॉक  घेण्यात आला आहे. हा ब्लॉक 8 जानेवारी ते 10 जानेवारी दरम्यान सुरु राहील. आज दुपारी दोन वाजल्यापासून ब्लॉक सुरु होईल. तो ब्लॉक सोमवारी मध्यरात्री 2 वाजेपर्यंत सुरु राहील, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहेत.

ब्लॉक दरम्यान ठाणे कल्याण दरम्यान धिमी लोकल सेवा बंद

मध्य रेल्वेनं जाहीर केलेल्या 36 तासांच्या ब्लॉकमध्ये ठाणे ते कल्याण दरम्यान एकही लोकल ट्रेन धावणार नाही. या मार्गिकेवरील जलद लोकल सेवा मात्र सुरु असणार आहे. ब्लॉक काळात कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवरील लोकल सेवा बंद ठेवण्यात येणरा आहे.36 तासाात मुख्य मार्गावरील 390 लोकल फेऱ्या बंद ठेवण्यात येणार आहेत. फास्ट लोकल सुरु ठेवण्यासाठी लांब पल्ल्याच्या ट्रेन रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

कोणत्या ट्रेन्स रद्द?

7 आणि 8 जानेवारी
अमरावती एक्स्प्रेस, नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस
8 जानेवारी आणि 9 जानेवारी
जालना जनशताब्दी एक्स्प्रेस, मनमाड पंचवटी एक्स्प्रेस, अदिलाबाद नंदिग्राम एक्स्प्रेस, डेक्कन क्विन एक्सप्रेस, मुंबई अमरावती एक्स्प्रेस, नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, गदग एक्स्प्रेस, नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस
9 आणि 10 जानेवारी
अदिलाबाद नंदिग्राम एक्स्प्रेस,गदग एक्स्प्रेस
पुण्याला प्रवास संपणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या
हुबळी दादर एकस्प्रेस, कोयना एक्स्प्रेस
पुण्याहून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या
हुबळी दादर एकस्प्रेस, कोयना एक्स्प्रेस
लोकल सेवेतील आजचे बदल
आज दुपारी 1 ते 2 दरम्यान कल्याणहून सुटणाऱ्या अप धिम्या अर्ध जलदल लोकल कलण्याण ते माटुंगा रम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेतय यादरम्यानं ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा, नाहूर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार स्थनाकवर थांबा नसेल.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

324 thoughts on “ठाणे ते दिवा या मार्गावर कट आणि कनेक्शनच्या कामासाठी 36 तासांचा ब्लॉक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?