घेतलेल्या उचलीमधील पैसे फिरल्याने 14 ऊसतोड मजूर कामगारांना मारहाण करत ठेवले डांबून
Views: 714
0 0

Share with:


Read Time:7 Minute, 28 Second

बीड, 1 मे : 14 ऊसतोड मजूर कामगारांना डांबून ठेवल्याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास विभागीय पोलीस अधिकारी करत आहेत. मजुरांना डांबून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 365, ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केली आहे, अशी माहिती सहायक पोलीस उपाधीक्षक सुनील लांजेवार यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी संपूर्ण तपासाकरिता एक पथक तयार केले असून मजुरांचा शोध घेतला जात आहे.
“आज आम्हाला प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार 14 ऊसतोड मजुरांना डांबून ठेवल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहिता कलम 365, ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करीत आहेत. या संपूर्ण तपासाकरिता एक पथक तयार केले असून मजुरांचा शोध घेतला जात आहे. सदरचा प्रकार हा तेलंगणा राज्यात कृष्णा वेंणी साखर कारखाना येथे घडलेला आहे. सर्व ऊसतोड मजूर हे बीड जिल्ह्यातील आहेत. ते ऊसतोडणीला निघाले होते. काम संपल्यानंतर परत निघाले असताना हा प्रकार घडला आहे. पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ कारवाईला सुरुवात केली आहे”, अशी प्रतिक्रिया सहायक पोलीस उपाधीक्षक सुनील लांजेवार यांनी दिली.

बीडमध्ये ऊसतोड मजुरांच्या वाट्याला जे आलं ते एकूण चीड येईल. राज्यात आज सर्वत्र कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. मात्र सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंच्या जिल्ह्यात ऊसतोड मजुरांसंदर्भात संतापजनक प्रकार समोर आला आहे. कारखान्याचा पट्टा पडल्यानंतर घेतलेल्या उचलीमधील पैसे फिरल्याने, 13 महिला-पुरुष मजुरांसह त्यांच्या 9 लहान मुलांना डांबून ठेवण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पीडित कुटुंबातील नातेवाईकांनी याबाबतचा आरोप केला आहे. यामुळे वृद्ध आजीसह इतर नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे धाव घेतली आहे.

बीडच्या माजलगाव तालुक्यातील वारोळा गावातील व गेवराईच्या भेंड खुर्द गावातील ऊसतोड मजूरांनी, ट्रॅक्टर मालक मुकादम दत्ता दगडू गव्हाणे यांच्याकडून ऊसतोडणीसाठी पैशाची उचल घेतली होती. त्यांनतर त्यांनी कर्नाटक येथील ओम शुगर साखर कारखाना येथे जाऊन 6 महिने ऊस तोडणीचे कामही केले आहे. तर गेल्या आठ ते नऊ दिवसांपूर्वी कारखान्याचा पट्टा पडला आहे. मात्र ऊसतोडीसाठी घेतलेल्या ऊचलीपैकी काही पैसे मजुरांकडून फिरतात. यामुळे गाडी मालक दत्ता गव्हाणे यांनी त्यांना डांबून ठेवल्याचा आरोप ऊसतोड मजूर कुटुंबातील वृद्ध केसरबाई आडगळे, परमेश्वर गायकवाड यांनी केला आहे.
यामध्ये मदन आडागळे, उषा मदन आडागळे, जानवी मदन आडागळे, विष्णू गायकवाड, मंगल विष्णू गायकवाड, कचरु गायकवाड, राजूबाई कचरू गायकवाड, दीपक वाव्हळ, आशा दीपक वाव्हळ, बाळू पंडित, रेश्मा बाळू पंडित, सिंधुबाई पंडीत, रतन जाधव, छाया रतन जाधव यांच्यासह लहान मुलामुलींचा समावेश असल्याचं नातेवाईकांनी सांगितल आहे. तर गेल्या आठ दिवसांपासून कारखान्याचा पट्टा पडलाय. पण माझा मुलगा, सून, नात आली नाही. त्यांना पैशासाठी डांबून ठेवलंय. त्यांना सोडवा, त्यांना आणून द्या, त्यांना मारहाण केली जात आहे, असं म्हणत वृद्ध केशरबाई आडागळे यांना अश्रू अनावर झाले आणि त्या ढसाढसा रडल्या.

याविषयी तक्रारदार ऊसतोड मजूर परमेश्वर गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली. “मी माझी बायको, आई, वडील, भाऊ त्याची बायको, कारखान्याला ऊस तोडण्यासाठी गेलो होतो. मात्र पंधरा दिवसांपूर्वी माझा मुलगा खूप आजारी पडल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी, मी गावी बीडला आलो होतो. मात्र गेल्या आठ दिवसांपूर्वी कारखान्याचा पट्टा पडला आहे. कारखान्याहुन आठ दिवसांपूर्वी आमच्या कुटुंबातील सर्व व्यक्ती आणि इतर मजूर निघाले आहेत. मात्र ते अद्याप पर्यंत घरी आले नाहीत. उचलीमधील फिरलेल्या पैशामुळे त्यांना दत्ता गव्हाणे याने डांबून ठेवलं आहे. त्यांना मारहाण देखील करत आहे, असा आरोप गायकवाड यांनी केला.
“आम्ही त्याला म्हणालो आता आमच्याकडे पैसे नाहीत. सहा महिने कारखान्याला होतो. तुम्हाला एक महिन्यानंतर उचल सुरू झाल्या की देऊ. तोपर्यंत आमच्या घराचे कागदपत्र तुमच्याकडे ठेवा. मात्र तो ऐकत नाही. त्यांनी सर्वांना कुठंतरी डांबून ठेलवलंय. डांबलेल्या मजुरांमध्ये मोठ्या प्रमाणात महिला आणि मुली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अत्याचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही”, असा संशय त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, आज राज्यात कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतांना, ऊसतोड मजुरांच्या या गंभीर प्रकाराकडे कोणीही लक्ष दिले नाही. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह डझनभर ऊसतोड मजूर नेते समोर येऊन या कामगारांची सुटका करणार का? आणि त्या रडणाऱ्या वृद्ध आज्जीच्या आणि इतर नातेवाकांच्या चेहऱ्यावर हसू फुलविणार का? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
1
Is there any news?