वडगांव मावळ येथून ०२ गावठी पिस्टल व ०४ जिवंत काडतुसे जप्त; पुणे ग्रामीण एलसीबीची दमदार कामगिरी
Views: 138
0 0

Share with:


Read Time:2 Minute, 42 Second

पुणे:  पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची टिम वडगांव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना PC प्राण येवले यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार वडगांव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत जुना पुणे ते मुंबई हायवे रोडवर वडगांव-तळेगाव चौकात हायवेच्या बाजूला उभे असलेल्या दोन व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली वरून व मिळालेल्या बातमीच्या वर्णनावरून दोन खालील इसम नामे १) अनिल राघू शिंदे वय ३३ रा पवनानगर, ता. मावळ जि.पुणे ह.मु. पौड ता.मुळशी, जि पुणे
२) धर्मेश रवींद्रकुमार जयस्वाल वय २३ वर्ष, रा.काळा तलाव,भिकाजी भैय्या चाळ, कल्याण पश्चिम जि ठाणे यांना सापळा रचून मोठ्या शिताफीने ताब्यात घेवून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचेकडून विनापरवाना व बेकायदेशीर हेतुने दोघांच्याही कमरेला बाळगलेले प्रत्येकी ०१ गावठी पिस्टल व मॅगझीन मध्ये ०२ जिवंत काडतुस असे एकूण ०२ गावठी पिस्टल व ०४ जिवंत काडतुसे असे एकुण किं.रु.१,००,४००/- (एक लाख चारशे रुपये) चा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. आरोपी क्रमांक 1 हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वीचे 02 गुन्हे दाखल आहेत..
सदर आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी वडगांव मावळ पोलीस स्टेशनचे ताब्यात दिलेले आहे.

वडगांव मावळ येथून ०२ गावठी पिस्टल व ०४ जिवंत काडतुसे जप्त; पुणे ग्रामीण एलसीबीची दमदार कामगिरी

सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक श्री डॉ.अभिनव देशमुख सो.,मा.अप्पर पोलीस अधीक्षक पुणे श्री मितेश घट्टे सो.,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अशोक शेळके यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि रामेश्वर धोंडगे, Asi प्रकाश वाघमारे ,PN अमोल शेडगे, PN बाळासाहेब खडके, PC प्राण येवले, PC मंगेश भगत, Wpc पूनम गुंड, Wpc सुजाता कदम यांचे पथकाने केली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

You missed

Open chat
Is there any news?